🔹महात्मा फुलेंवर लवकरच तीन भाषांमध्ये चित्रपट
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.
फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये नामांकित, व्यावसायिक संस्थेकडून हा चित्रपट तयार केला जाणार आहे.
हा चित्रपट वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ई-निविदा मागवून संस्थेची निवड करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
No comments:
Post a Comment