Sunday, 3 June 2018

केरळमध्ये आता रोबोटने होणार मॅनहोलची सफाई

🔹केरळमध्ये आता रोबोटने होणार मॅनहोलची सफाई

केरळमध्ये लवकरच रोबोटच्या (यंत्रमानव) माध्यमातून मॅनहोलची सफाई केली जाणार आहे. देशात अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे. केरळ जल प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक ए. शॅनोमोल यांनी स्टार्टअप कंपनी जेनरोबोटिक्सकडून विकसित रोबोटचा अलिकडेच प्रायोगिक तत्वावर वापर झाल्याची माहिती दिली.

केरळ सरकार या योजनेबद्दल अत्यंत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. वाय-फाय, ब्लूटूथ आणि नियंत्रण प्रणालीने सज्ज हा रोबोट सीव्हरपासून जल-मल साफ करण्यास सक्षम आहे. या योजनेला केरळ जल प्राधिकरण निधी पुरविणार आहे. कंपनीने पाइप गळती आणि सफाईशी निगडित समस्यांवर तोडग्यासाठी नव्या विचारांना व्यवहार्य तंत्रज्ञानात बदलण्यासाठी केरळ स्टार्टअप मिशनसोबत काम केले आहे.

यंत्रमानवाचा वापर प्रारंभी तिरुअनंतपुरममध्ये केला जाणार आहे. या शहरात 5000 पेक्षा अधिक मॅनहोल्स आहेत. देशात सीव्हरच्या सफाईदरम्यान कामगारांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडतात. काही दिवसांच्या अगोदर आंध्रप्रदेशात सीव्हरची सफाई करताना 7 स्वच्छता कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. यानंतर सीव्हरमध्ये कामगारांना उतरविणे बेकायदेशीर ठरविण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

पावसाळी आजार; अशी घ्या खबरदारी

देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या...