Saturday, 2 June 2018

MHT CET 2018 चा निकाल जाहीर

MHT CET Result 2018 : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पीसीबी गटात अभिजित कदम याने 200 पैकी 188 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

पीसीएम गटात 200 पैकी 195 गुण मिळवत आदित्य अभंग पहिला आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थाना 3 जून रोजी त्यांच्या लॉग इनमध्ये पाहता येणार आहे.

पीसीबी गटात जान्हवी मोकाशी 200 पैकी 183 गुण मिळवत मुलींमध्ये प्रथम आली आहे. तसेच पीसीएम गटात मोना गांधी हिने 200 पैकी 189 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

निकाल कसा पाहाल?

http://dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना लॉग इन करावं लागेल.

लॉग इन केल्यानंतर जन्म तारीख किंवा अर्ज क्रमांक अशी मागितलेली माहिती टाकल्यानंतर तुमचा निकाल दिसेल.

No comments:

Post a Comment

पावसाळी आजार; अशी घ्या खबरदारी

देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या...