Saturday, 2 June 2018

मराठी पाऊल पडते पुढे

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषिविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री जाहीर झाला. अभिजीत कदम याने 'पीसीबी'मध्ये २००पैकी १८८ गुण मिळवत तर, आदित्य अभंग याने 'पीसीएम'मध्ये २००पैकी १९५ गुण मिळवित राज्यात प्रथम क्रमांकावर नाव कोरले.

'पीसीबी' गटातून मागासवर्गीय उमदेवारांमधून प्रशांत वायाळ याने २००पैकी १८२ गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला. तर, 'पीसीबी' गटातून जान्हवी मोकाशी २००पैकी १८३ गुण मिळवत तर 'पीसीएम'मध्ये मोना गांधी हिने १८९ गुण मिळवित मुलींमधून प्रथक क्रमांक पटकावला आहे. 
सीईटी विद्यार्थ्यांना दिलासा 

राज्य सीईटी सेलतर्फे राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १२६० परीक्षा केंद्रांवर सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४ लाख ३५ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९६.२८ म्हणजेच ४ लाख १९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. हा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र सीईटी सेलतर्फे शनिवारी रात्रीच या निकालाची घोषणा करीत राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 
सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, पीसीबी गटातून १६ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी १०० हून जास्त गुण मिळविले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढला असून गेल्यावर्षी १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी १००हून जास्त गुण मिळविले होते. पीसीएम गटात गेल्यावर्षी २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी १००पेक्षा जास्त गुण मिळविले होते. यंदा हे प्रमाण २२ हजार ८४४ इतके आहे. या परीक्षेमध्ये गणित व रसायनशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत घेतलेल्या हरकती प्रकरणी ५ गुण बोनस म्हणून देण्यात आले असल्याचे सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आज वेबसाइटवर पाहता येणार आहे.

No comments:

Post a Comment

पावसाळी आजार; अशी घ्या खबरदारी

देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या...