🔹भारताच्या शास्त्रज्ञांनी DNA आधारित गणनेमध्ये उपयोगात येणारे लॉजिक डिव्हाईस विकसित केले.
कोलकाता येथील इंडियन असोसिएशन फॉर द सॉल्टिव्हिलेशन ऑफ सायन्स (IACS) येथील शास्त्रज्ञांना DNA आधारित एक लॉजिक डिव्हाईस तयार करण्यात यश आले आहे, ज्याचा DNA आधारित गणनेमध्ये उपयोग होऊ शकतो.
एका छोट्या अणूचा वापर करून रियूजेबल YES आणि INHIBIT लॉजिक सिस्टम तयार करण्यात आले आहे. हा अणू फ्लोरोसेंट प्रोबप्रमाणे काम करतो आणि ह्यूमन टेलोमर्स व न्यूक्लिक अॅसिड क्लिविंग एंझाइम्स (न्यूक्लिसेस) यांच्यामध्ये आढळून येणार्या 4-स्ट्रेन्डेड DNA संरचना (जी-क्वाड्रुप्लेक्स) यांना जोडतो. कार्बाझोल लिगंड नावाचे फ्लोरोसेंट प्रोब मानवी जणूकामध्ये उपस्थित असलेल्या अन्य DNA संरचनेच्या व्यतिरिक्त एका निवडक पद्धतीने जी-क्वाड्रुप्लेक्सला जोडतो.
एकदा का प्रोब DNA (जी-क्वाड्रुप्लेक्स) सोबत जोडले गेले, तर मग छोटा अणू DNA ला कमकुवत करणार्या काही एंझाइमंना (न्यूक्लिसेस S1 आणि एक्झोन्यूक्लिसेस) रोखतो. मात्र, तरीही काही अन्य एंजाइम (DNase I आणि T7 एंडोन्यूक्लिसेस I) त्याही अवस्थेत DNA वर हल्ला करतात.
▪️या शोधाचे महत्त्व-
DNA-आधारित नॅनो तंत्रज्ञानावर आधारित नैदानिक संवेदक आणि अन्य जैव-आण्विक यंत्रे तयार करण्यासाठी हा शोध उपयोगी ठरू शकतो. यामुळे DNA कंप्युटेशन पद्धतीसाठी क्षमता तयार केली जाऊ शकते तसेच सिलीकॉन व DNA-आधारित संगणकांमध्ये जाळे तयार करू शकता येणार.
No comments:
Post a Comment