Sunday, 3 June 2018

इंटरनेट मध्ये महाराष्ट्र राज्य देशात उत्कृष्ट

इंटरनेट मध्ये महाराष्ट्र राज्य देशात उत्कृष्ट

देशातील 1 लाखांहून अधिक ग्रामपंचायती 'भारत नेट'च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबॅंडद्वारे जोडल्या आहेत.
 
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र हे 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' ठरले. राज्यातील 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडल्या आहेत.
 
देशात 31 डिसेंबर 2017 अखेर 2 लाख 54 हजार 895 किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण केले असून, याद्वारे हायस्पीड ब्रॉडबॅंड सेवेने देशातील 1 लाख 1 हजार 370 ग्रामपंचायतींना 'भारत नेट'च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवेने जोडले.
 
'भारत नेट' या नावाने हा उपक्रम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबॅंडद्वारे जोडलेल्या कामाबद्दल महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले.
 
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'भारत नेट' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभाग आघाडीवर आहे.
 
भारत नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 11 जिल्ह्यांत एकूण 3 हजार 604, मराठवाड्यात 3200, खानदेशात 1755, पश्‍चिम महाराष्ट्रात 2421, तर कोकण विभागात 1365 ग्रामपंचायतींत इंटरनेट सेवा उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

पावसाळी आजार; अशी घ्या खबरदारी

देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या...