Monday, 4 June 2018

‘एटीएम व्यवहार, चेकबुकवर जीएसटी लागत नाही’

एटीएममधून पैसे काढणे किंवा चेकबुक यासारख्या बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणार्‍या नि:शुल्क सेवांवर जीएसटी लागू होत नसल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, क्रेडिट कार्डचे बिल उशिरा भरल्यानंतर लागणार्‍या शुल्कावर जीएसटी लागू होणार आहे.

अनिवासी भारतीयांकडून विमा खरेदीवरही जीएसटी लागणार आहे. महसूल विभागाने बँकिंग सेवा, विमा आणि शेअर यावर जीएसटी लागण्यासंबंधित पुन्हा पुन्हा विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांवर (एफएक्यू) उत्तर देत हे स्पष्टीकरण दिले आहे. वित्तीय सेवा विभागाने हा मुद्दा गेल्या महिन्यात महसूल विभागाकडे पाठवला होता.

कर  अधिकार्‍यांनी एसबीआयसह काही सरकारी आणि खासगी बँकांना नोटीस बजावली. या नोटीसमध्ये 2012 पासूनच्या टॅक्सची मागणी केली होती, ज्यामध्ये व्याज आणि दंडाचाही समावेश होता. यानंतर बँकांनी हे प्रकरण अर्थमंत्रालयासमोर मांडले. 

हा टॅक्स बँका ग्राहकांकडून वसूल करण्याच्या तयारीत होत्या. या सेवांमध्ये चेकबुक आणि एटीएममधून पैसे काढण्याचा समावेश होता. त्यानंतर अर्थमंत्रालयाने बँकिंग सेवांवर जीएसटी लागू नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

No comments:

Post a Comment

पावसाळी आजार; अशी घ्या खबरदारी

देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या...