Thursday, 28 June 2018

पावसाळी आजार; अशी घ्या खबरदारी

देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या साथीत 90 च्या दशकातील धुंद करून सोडणारे संगीत जोडीला असेल तर त्याची मजाच निराळी, पण असे असले तरी, ऋतुमानातील बदलांचे वास्तव मात्र वेगळे आहे.मुख्यत्वे सर्वात मोठी जाणवणारी अडचण म्हणजे ऋतुमानानुसार येणारी आजारपणं. पावसाच्या जोडीला तीही चिकटूनच येतात. वातावरणातील बदलामुळे पावसाळ्यात नेहमी होणार्‍या या पाचआजारांकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी स्वतःला तयार केलं की अर्धी लढाई जिंकल्यासारखं असतं.

डेंग्यू : सकाळी लवकर किंवा पहाटेच्या वेळी चावणार्‍या डासांमुळे हा आजार पसरतो. त्यामुळे सततची डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे व स्नायूंमध्ये वेदना उद्भवतात. पोटदुखी, रक्‍तस्त्राव आणि चक्‍कर येणे अशी गुंतागुंतीची स्थितीही डेंग्यू हेमौरहजिक फिवर मध्ये उद्भवू शकते.

खबरदारी : डास चावू नयेत यासाठी कपडे, रीपलंट क्रीम याकडे विशेष लक्ष द्यावे.

उपचार - डेंग्यू झाल्यावर मोठ्या प्रमाणावरील गुंतागुंत टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप महत्त्वाचे असते. डेंग्युवर विशिष्ट उपचार नाहीत. लक्षणे बघून त्यानुसार उपचार ठरवावे लागतात.  

मलेरिया : हा आजार अ‍ॅनोफेलस जातीच्या डासाच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्याच्या डबक्यात या डासांची पैदास होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि घामही येणे या गोष्टी सतत होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. यावर वेळेवर उपचार झाले नाहीत तर त्याचे पर्यवसन कावीळ, प्रचंड अशक्‍तपणा किंवा कधीकधी तर मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्यातही होते.

खबरदारी- हा आजार डासांमुळे होतो. त्यामुळे तुमच्या राहण्याच्या जागेजवळ डासांची पैदास रोखणे गरजेचे असते. जोडीला मच्छरदाणी आणि डास घालविणार्‍या पदार्थांचा वापर केल्यास या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो.

उपचार - मलेरियाचे निदान पक्के झाल्यावर, डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे मलेरिया विरोधी औषधं सुरू करावी लागतात.

कॉलरा (पटकी) : दूषित अन्‍न, दूषित पाणी आणि अस्वच्छता यामुळे पसरणारा हा भयानक आजार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलट्या आणि जुलाब होतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण प्रचंड कमी होऊ शकते इलेक्ट्रोलाईट असंतुलन निर्माण होऊ शकते.

खबरदारी - हा आजार रोखण्यासाठी हातांचे आरोग्य सांभाळणे, अन्‍नपदार्थ स्वच्छ धुणे आणि शिजवणे महत्त्वाचे असते. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले अन्‍नपदार्थ खायचे टाळा. केवळ गाळलेले आणि उकळलेले पाणीच प्या.

उपचार : शरीरातून सतत कमी होणारे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तोंडाने सतत द्रवपदार्थांचे सेवन सुरू ठेवणे गरजेचे असते. तोंडाने कमी द्रवपदार्थ जात असले आणि प्रचंड प्रमाणात उलट्या, जुलाब होत असतील तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात.

लेप्टोस्पायरोसिस : त्वचेवर कुठे कापले असेल किंवा डोळे, तोंड आणि नाक यांचा प्राण्यांचे मूत्र किंवा प्राण्यांचे मूत्र असलेले पाणी यांच्याशी संपर्क झाला तर हा भयानक आजार उद्भवू शकतो. काहीही लक्षणं दिसून न येणे इथंपासून डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि पार फुफ्फुसात रक्‍तस्त्राव किंवा मेंदूदाह इथंपर्यंत या रोगाची लक्षणे असू शकतात.

खबरदारी - प्राण्यांचे मलमूत्र असलेल्या दूषित पाण्याशी संपर्क टाळणे. जर तुम्ही शेती करत असाल किंवा स्वच्छता कामगार म्हणून काम करत असाल तर पुरेसे संरक्षणात्मक कपडे अंगावर घाला.

उपचार - निदान झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने विशिष्ट प्रतिजैविके घ्यावीत.

हिपेटायटीस : विषाणूमुळे होणारा हा खूपच संसर्गजन्य आजार आहे. पाण्यातून पसरणारा हा विषाणू असून बाधित विष्टेमुळे दूषित झालेल्या अन्‍न वा पाण्यामुळे हा आजार बळावतो. त्यामुळे कावीळ होते (पिवळे डोळे आणि त्वचा, गडद रंगाचे मूत्र) तसेच पोटदुखी, भूक मंदावणे, अन्‍नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्‍तपणा जाणवतो.

खबरदारी - स्वच्छ, सुरक्षित पाणी आणि सकस आहार आवश्यक असतो. हातांचे आरोग्य खूप महत्त्वाचे असते.

उपचार - यासाठी विशिष्ट उपचारपद्धती आहे. लक्षणांनुसार उपचार ठरवले जातात. पुढे जाऊन होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं.

इतर उपाय : स्वच्छ (गाळलेले किंवा उकळलेले) पाणी प्या.

खोकताना वा शिंकताना तुमचे तोंड आणि नाक रुमालाने झाकून घ्या.

घरात आत असताना मच्छरदाणी किंवा डास घालविणार्‍या पदार्थांचा वापर करा. बाहेर असताना डास चावू नयेत म्हणून वापरण्यात येणारं क्रीम लावा.

पाणी साचू देऊ नका.

त्वचेला फंगल (बुरशीसारखे) संसर्ग टाळण्यासाठी कोरडे कपडे घाला.

ताजे, शिजवलेले अन्‍न खा आणि बाहेरचे अन्‍नपदार्थ खाणे टाळा.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!

पावसाळ्यात लहानांसोबत मोठ्यांचीही इम्यूनिटी कमी होते. पावसाळा अनेक आजारांना निमंत्रण देते. वारंवार होणारी सर्दी, खोकला आणि ताप यामुळे अनेकजण हैराण असतात. पण तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्हाला या समस्यांवर मात करणे सोपे होते. म्हणून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा. पाहुया रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात....

आवळा

सकाळी नाश्यात एक आवळा खा. व्हिटॉमिन सी युक्त आवळ्यामुळे तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

कोरफड ज्युस

यात अॅंटी ऑक्सिडेंट असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढून आजारांशी सामना करण्यास मदत होते. ३० मिली कोरफड ज्यूस १०० मिली पाण्यात मिसळून प्या.

अक्रोड

अक्रोडमुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढते. म्हणून पावसाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी अक्रोड अवश्य खा.

अळशी

अळशीत ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.  त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी शरीर तयार होते. अळशी वाटून त्याची पावडर बनवा व दही किंवा सलाडवर घालून त्याचे सेवन करा.

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ग्रीन टी घ्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!

पावसाळ्यात लहानांसोबत मोठ्यांचीही इम्यूनिटी कमी होते. पावसाळा अनेक आजारांना निमंत्रण देते. वारंवार होणारी सर्दी, खोकला आणि ताप यामुळे अनेकजण हैराण असतात. पण तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्हाला या समस्यांवर मात करणे सोपे होते. म्हणून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा. पाहुया रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात....

आवळा

सकाळी नाश्यात एक आवळा खा. व्हिटॉमिन सी युक्त आवळ्यामुळे तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

कोरफड ज्युस

यात अॅंटी ऑक्सिडेंट असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढून आजारांशी सामना करण्यास मदत होते. ३० मिली कोरफड ज्यूस १०० मिली पाण्यात मिसळून प्या.

अक्रोड

अक्रोडमुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढते. म्हणून पावसाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी अक्रोड अवश्य खा.

अळशी

अळशीत ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.  त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी शरीर तयार होते. अळशी वाटून त्याची पावडर बनवा व दही किंवा सलाडवर घालून त्याचे सेवन करा.

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ग्रीन टी घ्या.

Wednesday, 13 June 2018

मोबाईल कंपन्यांत डेटावरून स्पर्धा

'रिलायन्स जिओ'ला आणि एअरटेलला टक्कर देण्याच्या उद्देशाने आता भारत संचार निगम लिमिटेड अर्थात 'बीएसएनएल'ने नवीन ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार आता ग्राहकांना १४९ रुपयांच्या शुल्कात २८ दिवसांसाठी दररोज ४ जीबी डेटा मिळणार आहे. ही ऑफर १३ जून ते १५ जुलै या कालावधीसाठी वैध राहणार आहे. एअरटेल आणि जिओला टक्कर म्हणून ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

एअरटेलने नुकतीच दररोज तीन जीबी डेटा देणारी ऑफर सुरू केली आहे. यानंतर लगेचच जिओनेही सध्याच्या ग्राहकांना दररोज दीड जीबी अतिरिक्त डेटा देऊ केला आहे. जिओच्या नव्या ऑफरनुसार १४९, ३४९, ३९९ व ४४९ रुपयांच्या प्लॅनवर रोज तीन जीबी डेटा मिळेल. याशिवाय तीनशे रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रिचार्जवर जिओने शंभर रुपयांची सवलत दिली आहे. त्यापेक्षा कमी रकमेच्या रिचार्जवर २० टक्के सवलत मिळेल. माय जिओ अॅपवर फोनपेच्या माध्यमातून रिचार्ज केल्यास ही सवलत मिळणार आहे.
'बीएसएनएल'चा १४९ रुपयांचा पॅक बुधवारपासून रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, १४ जूनपासून सर्व परिमंडळांमध्ये उपलब्ध होणार आहे. प्रामुख्याने ही ऑफर फिफा वर्ल्डकपमध्ये तरुण ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे.

Thursday, 7 June 2018

दहावीचा निकाल (०८ जून २०१८)

✍ _* दहावीचा निकाल *_
▪ _महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच शुक्रवारी 8 जून 2018 रोजी जाहीर होणार आहे._
 बोर्डाच्या www.mahresult.nic  या वेबसाईटवर दुपारी 1 पासून हा निकाल पाहता येईल.
‍ राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
❗ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
⌛ दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे.
 _*दहावीचा निकाल कोणत्या कोणत्या वेबसाईटवर पाहू शकाल?*_
▫ www.mahresult.nic.in
▫ www.sscresult.mkcl.org
▫ www.maharashtraeducation.com

Wednesday, 6 June 2018

ठाण्यात धावली पहिली इलेक्ट्रिकल बस

ठाणे शहरामध्ये दाखल झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिकल बसला अखेर टीएमटी ताफ्यात सामावून घेण्यात आले असून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पहिल्या बसचा प्रवास सुरू करण्यात आला. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि फ्रान्सचे मुंबई वाणिज्यदूत कार्यालयाचे कौन्सिल जनरल येवेस पेरिन यांच्या प्रवासाने या बसचे लोकार्पण झाले. टीएमटीच्या अन्य बसेसच्या तिकीट दरामध्येच या वातानुकूलीन बसचा लाभ प्रवाशांना घेता येणार असल्यामुळे पुढील बस गाड्यांची प्रतीक्षा ठाणेकरांना लागून राहिली आहे. शहरातील रस्त्यांवर लवकरच ही बस धावताना दिसणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊन शहरातील पर्यावरणपूरक दळवळणालाही चालना मिळणार आहे. वर्षभरात शहरात १०० इलेक्ट्रिक बसेस चालविण्यास सुरुवात होणार आहे.

ठाणे परिवहन विभागाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली इलेक्ट्रिक बस १०० टक्के बॅटरीवर चालणार असून या इको फ्रेंडली इलेक्ट्रिकल बसची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी फ्रान्सच्या वाणिज्यदूत कार्यालयाचे आर्थिक सल्लागार जीन मार्क मिगनॉन, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, यांच्यासह महापालिकेतील अधिकारी वर्ग उपस्थित होता. केंद्र सरकारने २०३०पर्यंत 'इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन' घडविण्याचा निर्धार केला असून 'नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन' तयार केला आहे. या उपक्रमांतर्गत अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने टीएमटीच्या ताफ्यामध्ये दाखल होऊन तात्काळ प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेसाठी पालिकेने पीपीपी तत्त्वावर या इलेक्ट्रिकल बस सेवेत सामावून घेतल्या आहेत. यासाठी पालिकेला कोणताही आर्थिक भार उचलावा लागणार नाही. या बसच्या व्यवस्थापनासाठी प्रतिवर्ष प्रतीबस १ लाख २० हजार रुपये संबंधित कंपनीकड़ून पालिकेला मिळणार आहेत. विशेष म्हणजे इतर बसगाड्यांच्या तुलनेत या इलेक्ट्रिकल बसला कमी देखभालीची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे या बसगाड्यांचे तिकीटही अन्य टीएमटी बसप्रमाणेच असणार आहे. याशिवाय या बसमध्ये वातानुकूलीत प्रवासाचा अनुभव ठाणेकरांना मिळणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण बस…

इलेक्ट्रिक बसचे वैशिष्ट्य म्हणजे १०० टक्के बॅटरीवर चालणारी ही बस एकदा चार्ज केल्यानंतर २२० किमी. अंतर कापते. ही बस संपूर्ण वातानुकूलित असून ती धूर सोडत नाही. त्यामुळे धुराच्या त्रासापासून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. ३२ प्रवाशांची क्षमता असलेल्या आणि संपूर्णपणे स्वयंचलित असलेल्या या बसचा आवाजही कमी असल्यामुळे प्रवाशांना आवाजविरहित प्रवासाचा अनुभवही घेता येणार आहे. बसच्या दोन्ही दरवाजांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून मोबाइल चार्जिंग, एलईडी टीव्ही, वायफाय तसेच ई-तिकिटांची सोयही या बसमध्ये आहे. लवकरच जीपीआरएस सुविधाही या बसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आनंदनगर जकातनाका परिसरात महापालिकेकडून या इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून टप्प्याटप्प्याने शहरामध्ये इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. याशिवाय चार इलेक्ट्रिक स्कूटरही महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. विद्युत विभागाकडून त्यांचा वापर केला जाणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या स्कूटर ७० किमी चालतील.

SSC RESULT 2018 : दहावीचा निकाल या दिवशी लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, याच दिवशी निकाल जाहीर होईल, अशी शक्यता नाही. सूत्रांच्या माहीतीनुसार ८ जून किंवा ११ जून २०१८ रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. ८ जूनला तारीख घोषीत होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल जाहीर करण्याची पूर्ण तयारी झाल्याची माहिती हाती आलेय. दहावीचा निकाल www.mahresult.nic.in वर जाहीर होईल.

दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च दरम्यान झाली. परीक्षेला १८ लाख विद्यार्थी बसले होते.  दरम्यान, दहावीचा निकाल ८ जूनला लागण्याची शक्यता आहे. जर या दिवशी निकाल काही कारणाने जाहीर झाला नाही तर ११ जून रोजी निकाल घोषीत होईल. तर दुसरीकडे ४ जून रोजी निकाल घोषीत होईल, असे सांगण्यात आले होते. विद्यार्थी www.examresults.net वर पाहू शकता.

असा पाहा रिझल्ट

- प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाइट www.mahresult.nic.in वर जा.
- आता मुख्यपृष्ठ लिंक एचएससी परीक्षा निकालावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर उघडणारे वेबपेजवर आपली माहिती टाका. ओके करा.  
- क्लिक करून आपण आपला रिजल्ट स्क्रीनवर पाहू शकाल
- येथूनच रिझल्ट डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

Tuesday, 5 June 2018

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पदोन्नतीमधील आरक्षण कायम राहणार!

🔹सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पदोन्नतीमधील आरक्षण कायम राहणार!

नोकरीत पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वाणिज्य मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2016 रोजी आदेश काढून सर्व प्रकारच्या पदोन्नतीवर बंदी घातली होती.

सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एससी/एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची परवानगी दिली आहे.

घटनापीठ या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत सरकार पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ शकतं, असं सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारलं सांगितलं.

सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडताना एएसजी मनिंदर सिंह म्हणाले की, "कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणं ही सरकारची जबाबदारी आहे. देशातील विविध उच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे ही पदोन्नती थांबली होती." सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देताना, सर्व प्रकरणं एकत्र केली आणि याची सुनावणी घटनापीठ करणार आहे.

नोकरीत पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वाणिज्य मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2016 रोजी आदेश काढून सर्व प्रकारच्या पदोन्नतीवर बंदी घातली होती.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केल्याने मोदी सरकारवर टीका होत आहे. यानंतर देशभरात दलितांचा आक्रोश समोर आला होता. परंतु या निर्णयामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळू शकतो.

2006 चा आदेश काय सांगतो?
2006 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयानुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना बढतीमध्ये आरक्षण देणारं संविधानाचं कलम 14(4अ) सरकारसाठी अनिवार्य नाही. काही निश्चित अटींसह ही तरतूद लागू करता येऊ शकते. या अटी आहेत, मागसलेपण, नेतृत्त्वाची कमतरता दूर करणं आणि प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं.

मुंबई हायकोर्टाचा 4 ऑगस्ट 2017 चा निर्णय
सरकारी नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी दिलं जाणारं आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट 2017 रोजी सुनावला होता. सरकारी नोकरीत पदोन्नतींमध्ये अनुसूचित जाती (13 टक्के), अनुसूचित जमाती (7 टक्के), भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागासवर्गीय (13 टक्के) या आरक्षण गटांतील अधिकारी यांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा 25 मे 2004 रोजीचा निर्णय अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी बहुमत निकालाच्या आधारे रद्दबातल ठरवला.

Monday, 4 June 2018

इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांचे मराठी माध्यमांतर

पालकांच्या निग्रहामुळे शिक्षणक्षेत्रात बदलाचे नवे वारे

मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत आहे, इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, अशा चर्चा सातत्याने होत असताना अलीकडे पालक मराठी माध्यमाच्या शाळेला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवत असल्याचा नवा कल दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांत दोन लाख पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांतील शाळांमधून काढून मराठी माध्यमांच्या शाळेत टाकल्याची आकडेवारी आहे.

शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे की मराठी, हा मोठा चर्चेचा विषय आहे. जागतिक पातळीवर इंग्रजीचाच बोलबाला आहे. त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले, तरच ती त्या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देऊ शकतील अशा समजुतींसह फॅशन म्हणून कित्येक पालक मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश करून देतात. गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्याबरोबरच मराठी माध्यमाच्या शाळांची संख्याही पुरेशा पटसंख्येअभावी कमी झाली. मात्र आता हे चित्र बदलत आहे. मुलांना इंग्रजी माध्यमात शिकताना येणाऱ्या अडचणी, मुलांवरचे वाढते दडपण, मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. सध्या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना हा नवा कल दिसून येत आहे.

‘एटीएम व्यवहार, चेकबुकवर जीएसटी लागत नाही’

एटीएममधून पैसे काढणे किंवा चेकबुक यासारख्या बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणार्‍या नि:शुल्क सेवांवर जीएसटी लागू होत नसल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, क्रेडिट कार्डचे बिल उशिरा भरल्यानंतर लागणार्‍या शुल्कावर जीएसटी लागू होणार आहे.

अनिवासी भारतीयांकडून विमा खरेदीवरही जीएसटी लागणार आहे. महसूल विभागाने बँकिंग सेवा, विमा आणि शेअर यावर जीएसटी लागण्यासंबंधित पुन्हा पुन्हा विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांवर (एफएक्यू) उत्तर देत हे स्पष्टीकरण दिले आहे. वित्तीय सेवा विभागाने हा मुद्दा गेल्या महिन्यात महसूल विभागाकडे पाठवला होता.

कर  अधिकार्‍यांनी एसबीआयसह काही सरकारी आणि खासगी बँकांना नोटीस बजावली. या नोटीसमध्ये 2012 पासूनच्या टॅक्सची मागणी केली होती, ज्यामध्ये व्याज आणि दंडाचाही समावेश होता. यानंतर बँकांनी हे प्रकरण अर्थमंत्रालयासमोर मांडले. 

हा टॅक्स बँका ग्राहकांकडून वसूल करण्याच्या तयारीत होत्या. या सेवांमध्ये चेकबुक आणि एटीएममधून पैसे काढण्याचा समावेश होता. त्यानंतर अर्थमंत्रालयाने बँकिंग सेवांवर जीएसटी लागू नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

'त्या' शून्य रुपये वीजबीलाचं कोडं उलगडलं, महावितरण म्हणतंय...

शून्य रुपयाचे वीजबील आणि 10 रुपयांचा दंड असं भन्नट वीजबील गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर व्हायरल झालं होतं. शून्य वीज बिलामुळे दहा रुपयांचा दंड कसा भरणार असा प्रश्न सर्वांचा पडला होता. पण याचा खुलासा दस्तर खुद्द महावितरणने केलाय.

'सरकारी काम अन् चार महिने थांब' असं उगाच म्हटलं जात नाही पण महावितरणने तर याही पुढे जाऊन एका ग्राहकाला चांगलाच बुचकाळ्यात पाडलं. सांगलीतील राहुल वरद यांना महावितरणने शून्य वीजबिल पाठवले. आणि सात दिवसांत वीजबिल नाही भरले तर 10 रुपये दंड भरावा लागेल असं नमूद केलं. साहजिकच शून्य रुपये भरायचे कसे आणि नाही भरले तर 10 रुपयांचा दंड का भरायचा असा प्रश्न राहुल वरद यांच्यासह अख्या सोशल मीडियाकर्मींना पडला. अनेकांनी हे वीजबिल फेक असल्याचं सांगितलं. पण, हा प्रकार खरोखरचं घडला असं महावितरणनेच स्पष्ट केलं.

नवीन सुधारित बिलावर देय रक्कम, दंडाची रक्कम शून्य दाखवण्यात आली असून तांत्रिक कारणांमुळे ‘शून्य’ रुपयांच्या वीजबिलास 10 रुपये दंड/विलंब आकार लागल्याचा खुलासा महावितरणने केलाय.

महावितरण म्हणतंय, राहुल वरद हे महावितरणच्या विश्रामबाग (जि. सांगली) उपविभागाचे वाणिज्य ग्राहक आहेत. त्यांचा ग्राहक क्रमांक 279100020747 असा आहे. मागील सहा महिन्यांपासून  वरद त्यांचे बिल आगाऊ भरत आहेत. त्यामुळे त्यांना येणारे वीज बिल येत वजा रकमेचे येत होते. मे महिन्यात त्यांना 99 युनिटच्या वीज वापरापोटी १२२२.२६ रुपये इतके वीजबिल आकारण्यात आले. परंतु वरद यांची १२२३.०८ रुपये रक्कम महावितरणकडे शिल्लक होती. त्यामुळे वीजबिलावर देय रक्कम ‘शून्य’ आली.

10 रुपयांची तांत्रिक चूक

चालू महिन्याचे वीजबिल आणि महावितरणकडे ग्राहकाची असलेली शिल्लक/आगाऊ रक्कम यात एक रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यामुळे देयक रक्कम शून्य आली आहे. तर चालू देयकावर सात दिवसानंतर भरावयाची रक्कम शून्य येणे अपेक्षित होते. तांत्रिक चुकीमुळे त्याठिकाणी 10 रुपये दाखविण्यात आली. त्याची दुरूस्ती सुधारित बिलामध्ये करण्यात आली असून ग्राहकाला नव्याने सुपूर्द केलेल्या वीजबिलावर सर्व रकमा ‘शून्य’ करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने यंत्रणेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत असं स्पष्टीकरण महावितरणने दिलंय.

पावसाळी आजार; अशी घ्या खबरदारी

देशात पावसाचं आगमन होतं आणि ओल्या मातीच्या सुवासाने आपण सगळेच धुंद होऊन जातो. गरम, वाफाळता चहा आणि जोडीला चटकदार पदार्थ. पावसाच्या आवाजाच्या...