सध्याच्या धावपळीच्या या जीवनात लोक खाण्या-पिण्याऐवजी कॅल्शियम, विटामिन व मिनरल्सच्या गोळ्या खाण्यावर भर देत असतात. तसेच सप्लीमेंटवरही भर दिला जातो. या लोकांना असे वाटते की, या गोळ्यांमुळे आपल्या खाण्यात जे काही कमी पडते, ते या गोळ्यांमधून मिळते. मात्र, खरोखरच जर तुम्ही असे करत असाल, तर पैशांचा वायफळ खर्च बंद करा, असा जणू सल्लाच एका नव्या संशोधनात देण्यात आला आहे.
कॅनडातील ‘सेंट मायकल हॉस्पिटल’ व ‘टोरांटो युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी यासंदर्भात सविस्तर संशोधन केले आहे. यात असे आढळून आले की, विटामिन आणि मिनरल्सच्या गोळ्यांनी शरीरात म्हणावा तसा फरक पडत नाही. मात्र, याचा शरीरावर कोणता साईड इफेक्टही होत नाही, हे विशेष. खाण्या-पिण्यातील कमतरता दूर करण्यासाठी लोक मल्टिविटामिन, विटामिन डी, कॅल्शियम आणि विटामिनच्या गोळ्यांचे सेवन करतात. या गोळ्यांचा शरीराला कसलाच फायदा होत नसला, तरी नुकसानही होत नाही. ‘जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment